एक प्रश्न

आज नथुराम गोडसे यांची पुण्यतिथी.

गांधीवधाबद्दल नथुराम यांना फाशी दिले गेले. गांधी हे अहिंसेचे पूजक, समर्थक व प्रसारक. 'डोळ्याला डोळा' या न्यायाने सगळे जग आंधळे होईल असा युक्तिवाद गांधीवादी 'हिंसेला हिंसा हे उत्तर नाही' याचे समर्थनार्थ करतात.

फाशी म्हणजे हत्या हे समजत असतानाही नथुराम गोडसे यांना फाशी का दिली गेली? तो न्यायालयाचा निर्णय होता असा युक्तिवाद कदाचित गांधीवादी करतीलही, पण एकाही गांधीवाद्याने या फाशीला अक्षेप घेतला नाही, त्याविरुद्ध आंदोलन केले नाहीवा कुणी आमरण उपोषणासही बसला नाही हे सत्य आहे.

आपल्याच तत्त्वाच्या विपरीत वर्तन अहिंसावाद्यांना कसे काय आवडले? की हिंसेचा बळी हा त्यांचा प्रिय नेता असल्याने त्याच्या वधकर्त्याला वेगळा न्याय त्यांना अभिप्रेत होता? (मला कम्युनिष्टांचे ब्रीदवाक्य आठवले - " ऑल आर इक्वल बट सम आर मोअर इक्वल")

ही फाशी म्हणजे अहिंसेचा पराभवच नाही का?

(प्रशासकांची पुस्ती :

खालील मुद्दे ह्या आणि इतर अनेकानेक संकेतस्थळावर
वारंवार चर्चिले जाऊन आता ते येथे अतिचर्चित, अतिचर्वित म्हणून निवृत्त
आणि वर्ज्य असे गणले गेलेले आहेत. येथे चर्चा करताना खालील मुद्दे आढळल्यास
ते काढून टाकले जाण्याची शक्यता आहे.

ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी ही चर्चा आंतरजाला वरच्या इतर अनेक संकेतस्थळांवर (जेथे चालू असेल तेथे जाऊन) करावी.

१. म. गांधींचे मुस्लिमविषयक धोरण, निर्णय आणि आनुषंगिक मुद्दे.
२. गांधीहत्या आणि आनुषंगिक मुद्दे
३. भारताच्या फाळणीचा इतिहास आणि आनुषंगिक मुद्दे.

इत्यादी. (ह्या यादीत वारंवार बदल होण्याची शक्यता आहे.)

अर्थात एखाद्या लेखनाच्या बाबतीत वरील यादीत वाढ
करणे, कपात करणे किंवा तिच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करणे ह्याचा अधिकार
प्रशासनाने राखून ठेवलेला आहे. ह्याबाबत कृपया पत्रव्यवहार करू नये.

कळावे.)