साबुदाणा वडा

  • साबुदाणा १ वाटी
  • बटाटा १, अर्धे छोटे लिंबू
  • हिरव्या तिखट मिरच्या ५-६
  • कोथिंबीर
  • दाण्याचे कूट ४-५ चमचे
  • तेल, मीठ, साखर
३० मिनिटे
२ जणांना

१ वाटी साबुदाणा ४ तास भिजत घालावा. भिजवताना पाणी निथळून घ्यावे. नंतर तो साबुदाणा हाताने मोकळा करुन त्यात३-४ चमचे दाण्याचे कूट, मिरच्या वाटून, व कच्चा बटाटा साल न काढता किसुन घालणे. नंतर चविप्रमाणे मीठ, साखर  व लिंबू पिळणे. कोथिंबीर चिरुन घालणे. हे सर्व मिश्रण हाताने कालवणे.

कच्चा बटाटा घातल्याने वडे कुरकुरीत होतात.

ह्या मिश्रणातील थोडा गोळा घेउन तो दोन हातांच्या तळव्यांमधे घेउन पसरट दाबणे व तेलामधे तांबूस रंग येईपर्यंत तळणे.

नारळाच्या चटणीबरोबर गरम गरम वडे खाणे. नंतर जायफळ घातलेली गरम कॉफी पिणे.

रोहिणी

नाहीत.

सौ आई