स्मृतीला तुझ्या मी विसरणार आहे

स्मृतीला तुझ्या मी विसरणार आहे
स्वतःसच जणू मी
मिटवणार आहे।ध्रु।


ढगांनो, तुम्ही साथ लागेल द्याया
नयनयुग्म माझे बरसणार आहे ।१।


कधी स्वप्न होते जिथे पाहिले मी
तिथे राख माझी उधळणार आहे ।२।


भले प्रीतिशोका, पदर दाह माझा
स्वतः आत्मज्वाला विझवणार आहे ।३।

टीपा :

३.पर्याय:

स्व-अस्तित्व जणु मी मिटवणार आहे (हे शब्दशः भाषांतर झाले
असते. )
किंवा
स्वतःलाच जणु मी मिटवणार आहे
(ही ओळ आणि वर दिलेली ओळ खूपशी
सारखी असली आणि वृत्तात दोन्ही बसत असल्या तरी मूळ गाण्याच्या चालीतले (जणू... असे
म्हणताना) आलाप घेताना वर दिलेली ओळ जास्त सोपी जाते. )

१. इथे 'ढगांनो तुम्हा साथ लागेल द्याया' असे हवेसे वाटेल पण कोण कुणाला साथ देणार असा प्रश्न निर्माण होईल ती भानगड टाळलेली आहे.

२. ह्या कडव्याच्या भाषांतरात सुधारणेला भरपूर वाव आहे. (सुचवा बरे सुधारणा )

हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले  ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.

चाल : मूळ गाण्याचीच!   (लगागा लगागा लगागा लगागा) (भुजंगप्रयात... मनाच्या श्लोकांचे वृत्त  )(मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक  ... णार आहे असे जमवा. यमकाची जागा ठळक केलेली आहेच.