मन्मनोरथ आसवांतुन वाहले

मन्मनोरथ आसवांतुन वाहले
निष्ठ असुनी एकली मी
राहले ।ध्रु।

राहिले होऊन तृष्णा हे जिणे
अर्धवट प्रीतीकथानक राहले ।१।

तो पुढे करणार नाही छळ असा
हे म्हणूनी दर छळाला साहले ।२।

संपवून स्वतःसही मी टाकले
अंतर परि तसेच मधले राहले ।३।

टीपाः

१. पर्याय : छळ न करिल पुढे कदाचित तो असा
२. पर्याय : मी स्वतःलाही मिटवुनी टाकले
३. पर्याय : स्वप्न मनिचे आसवांतुन वाहले

हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले  ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.

चाल : मूळ गाण्याचीच!   गालगागा गालगागा गालगा  (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक ...  आहले असे जमवा बरका!  यमकाची जागा ठळक केलेली आहे.