उपकार तुझे होती मजवर

उपकार तुझे होती मजवर
मन इच्छी जे ते सांगू दे
माझी तुजवर प्रीती जडली गं
तुझ्या नयनी विसावा घेऊ दे

तू मजला हसणे शिकवीले
रडण्या सांगसी रडेन मी पण
अश्रूंचे अमुच्या दुःख नको
ते वाहती तर ते वाहू दे
माझी तुजवर प्रीती जडली गं
तुझ्या नयनी विसावा घेऊ दे

खेळ मांडशी वा विस्कटशी
मेलो तरीही दुवाच देईन
सजणी, उडणारी राख म्हणे
हे दुःख प्रीतिचे साहू दे
माझी तुजवर प्रीती जडली गं
तुझ्या नयनी विसावा घेऊ दे


चाल : मूळ गाण्याचीच! (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )
विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा.  कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे  शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.
२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )
३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा.