बहारीने माझी फुले लाटली

बहारीने माझी फुले लाटली, 
अकालावरी आळ अन् घेतला
असो वैर केले कुणी पण तरी, 
का नाव मैत्री हे त्याला दिले
न कळले मला हे समासक्तीके, 
का ही सजा मज मिळाली असे
कलालीणीनी मम मुखीचा चषक, 
काढून कोणास तो का दिला
प्रेमात, नव्हते मला ठाउकी, 
निरोप्या न कधी कुणी प्रियाला करी
अपराध माझाच झाला असा, 
तुझ्या हाती संदेश मी धाडीला  
न्यायाच्या तुझिया इथे ईश्वरा, 
मी ऐकल्या खूप चर्चा तरी
शिक्षा म्हणून एका अपराध्यासी, 
कशी बक्षिशी ईश्वरा तू दिली
हे मूळ हिंदी गीत कुणाचे आहे?