पाव-भजी

  • पावाचे स्लाइस ६
  • चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी, हिरव्या तिखट मिरच्या ४
  • लाल तिखट, मीठ, हिंग, हळद
  • हरबरा डाळीचे पीठ १ वाटी,
  • तांदुळाचे पीठ ४ -५चमचे
  • तळायला तेल
१५ मिनिटे
२ जणांना

पहिल्याप्रथम पावाच्या स्लाइसच्या सर्व कडा काढणे. नंतर त्याचे सुरीने चार  तुकडे करणे.

हरबरा डाळ व तांदुळाच्या पिठामधे चविप्रमाणे तिखट,मीठ व थोडीशी हळद आणि थोडासा हिंग घालणे. चिरलेली कोथिंबीर व बारीक चिरलेल्या मिरच्या घालून बटाटयाच्या भज्यांना भिजवतो तसे पिठ भिजवणे. (खूप पातळ पिठ भिजवू नये) पावाचे केलेले तुकडे पिठात भिजवून तांबुस रंग येईपर्यंत तळणे.  ६ स्लाइसमधे २४ भजी होतील.

तांदुळाचे पिठ घातल्याने भजी कुरकुरीत होतात आणि कोथिंबीर व मिरच्या घातल्याने भज्यांना वरुन हिरवा रंग येतो म्हणून दिसायला छान दिसतात व चविला चांगली लागतात.

रोहिणी

नाहीत

स्वानुभव