शापित स्त्री
संध्याकाळी सहासाडेसहालाच मोमीनभाई हजर झाला. त्याची लांबलचक इंनोवा मोठ्ठा आवाज करीत जमनाच्या मेनगेट जवळ उभी राहिली. एकतर गाडी जुनी झाली होती किंवा तिच्या मेंटेनन्स कडे दुर्लक्ष झाल्याने असं झालं असावं. असो जाडजूड मोमीनभाई त्याच्या पंटरना घेऊन उतरला. कुठेही जायचं तरी लवाजम्यासहित जायचं हा त्याचा खाक्या होता. तो आत शिरला आणि आपल्या भसाड्या आवाजात बोलत त्याने जमनाला जवळ घेतंल. जमनाच्या डोळ्यात सुटकेचे अश्रू आले. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हातं फिरवीत तो म्हणाला, "अब मै आया हूं ना? बिलकुल डरना नहीं."
तो आत आल्यावर त्याला गुंडाळून ठेवलेला येडीचा मृतदेह तिने दाखवला. त्यावर त्याने आपल्या एकदोन पंटरना आत बोलावलं. "देखो इसको अच्छी तरीकेसे ठिकाने लगाना है. आपसमे तय करके मुझे बोलना."
पंटर गेल्यावर त्याने दरवाजा लावला आणी म्हणाला, "चल जम्मो, कपडे उतारना, मेरे पास टाइम कम है. दुसरे किसीके लिये आपुन आता नहीं. रातको मालभी पहुचाना है. माल समझती है ना..."
मग जमना जरा चिडून बोलली, "ये मुरदेके सामने करेगा क्या. इतनीभी क्या जलदी है? इसको ठिकाने लगाके करेंगे. आजकी रात रुक जाना."
त्यावर तो म्हणाला, "देख अभी नहीं तो कभी नहीं."
मग मात्र तिने एक रूम तयार करायला सांगितली. सगळी ताळतंत्र सोडलेली माणसं. विधिनिषेध बाळगायला ती काही सोज्वळ संसारी माणसं नव्हती... लवकरच ते दोघे तयार केलेल्या रूममध्ये प्रवेशले. आत शिरल्या शिरल्या त्याने तिच्या अंगावर झडपच टाकली. तिने घाईघाईने दरवाजा लावला. आत नुसती ओरबाडाओरबाडी चालू होती. जोर करुण करून दोघांनाही चांगलाच दम लागला. कपडे नीटनेटके करीत तिने विचारलं, "कितने दिनका भूखा है रे?"
त्यावर तिला एक कानफटात भडकवीत तो म्हणाला, "भांचोद, फालतुकी पंचायत तेरेकु क्या करनी है? तेरे कामकी सोच. मुझे जानें दे. मुझे रातके दो बजे माल भी पहुचाना है."
असं म्हणून तिला धक्का देऊन तो बाहेर पडला. लवकरच पॅन्टरांशी चर्चा करून जवळच्याच एका पोलीस चौकेला लागून असलेल्या मुतारीची जागा निश्चित करण्यात आली. तिथल्याच स्त्रियांच्या भागात असलेल्या काउंटरवर कोणी नाही असेल पाहून तिथल्या माणसाच्या खुर्चीवर येडीचा मृतदेह थाडफर मेकअप करून बसवण्याचे ठरले. एकदोन पन्टरांनी तिचा मेकअप करायला सुरुवात केली. पण दहा पंधरा मिनिटांनी पेक्षा जास्त वेळा लागायला लागला तशी मोमीन ओरडला, "अरे उससे प्यार कर राहा है क्या? लगता है उससे शादी करना चाहता है."
ते ऐकून बाकीचे हसायला लागले. ते ऐकून मोमीन म्हणाला, "मै जोक नहीं मार राहा हऊ."
आस्ते आस्ते रात्रीचे दहा वाजत आले. मयतरी जवळची वरदळं कमी झाल्यावर, जस काही, काही घडलंच नाही अशा थाटात मृतदेह दोघा तिघांनी उचलला. जणूकाही एखाद स्वमान उचलावं तसा उचलून तिथल्या कर्मचाऱ्याच्या खुर्चीवर ठेवला. आणि अगदी सहज ते तिघे गाडीत येऊन बसले. रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांनी पाहिलं सुद्धा नाही... मग गाडी भरधाव दुसऱ्या कामासाठी निघाली. मोमीनला मुंबईच्या लोकांचं डोळेझाक करण्याच्या वृत्तीचं आश्चर्य वाटलं. यांच्या बापाला जरी मारुण फेकला तरी तितक्याच घाईने हे लोकं तिथून निघून गेले असते. तरीही नाही म्हंटलं तरी मोमीनला घाम फुटलाच. शेवटी ते वाईट कर्मच होतं.
... ते सगळेच निघून गेल्यावर थोड्याच वेळात त्या स्वच्छतागृहातं बसंणारा कर्मचारी शिटी वाजवीत परत आला. पण आपल्याच खुर्चीत बसलेली सुंदर स्त्री पाहून आश्चर्यचकित झाला. तो तिला लांबूनच म्हणाला, "कौन है बे तू? मेरी जगेपे बैठी हॊ. पैसा चुरानेका इरादा है क्या? कहांसे आई? उठ चल, जगा खाली कर."
अजूनही तो मृतदेह आहे हे त्याला जाणवलं नव्हतं. तो जवळ जाऊन बोलला तरी काहीच हालचाल अथवा उत्तर न आल्याने तो घाबरला. आणि जवळच असलेल्या चौकीत जाऊन बाहेर उभ्या असलेल्या हवालदाराला त्याने जे पाहिलं ते सांगितलं. त्या बरोबर हवालदार जाधव म्हणाला, "तुला कोणी भेटला नाय काय आजच्या दिवसात? रात्री जास्त झाली का? चल चल निकल इधरसे."
... मग शपथा घेतं घेतं तो म्हणाला, "अरे हवालदार सब मेरी कुर्सीपे मुर्दा बैठा है. देखो तो..."
असं म्हणून हवालदराचा हातं धरून त्याला स्वच्छतागृहाजवळ घेऊन आला. मग मात्र हवालदाराने तिच्या नाकाजवळ हातं नेऊन पहिला. कपाळाला हात लावल्यावर ते शरीर त्याला काल्या सारखं गार लागलं आणि तोही चरकला आणि त्या माणसाला घेऊन पोलीस चौकीत परत आला...
काही का कारण असेना राजमानेना मालतीचे वडील म्हणून त्यांचा विचार करणं भाग होतं. एक तर त्त्यांना आपल्या घरी आणावं नाहीतर काही दिवस तरी आपल्याला त्यांच्या बरोबर राहायला पाहिजे लोकलज्जेस्तव तरी हे करायलाच हव. त्यांनी त्यांच्याकडे जाऊन राहण्याची शक्यता झटकून टाकली. कारण रोज कामावर जावं लागतच होतं. शेवटी त्यांनी काही दिवस तरी त्यांनाच घरी आणण्याचं ठरवलं. मग त्यांना आपण आधीच का ठेवून घेतलं नाही? त्यांचं मन त्यांना कुरतडू लागलं. मग त्यांनी थोडे दिवस रजा मिळते का ते पाहायचं ठरवलं... ते अतिशय वाईट मूडमध्ये कामाला गेले. त्यांनी कसतरी मॅनेजर मनोज शहाला पटवलं. आणि आठ दिवसांची रजा घेतली. तेही मॅनेजरने तंबी दिली. "अगर तू नौवे दिन नहीं आया ना तो तेरा "फुलं अँड फायनल कर दूंगा, ध्यानमा रख."
त्यांनी घरी येऊन विचार करण्याची ठरवलं. इतकी वर्षं कामं केलं तरी फालतू बोलणी ऐकून घ्यावी लागतात याचं त्यांना वाईट वाटलं. अजून आठ दहा वर्ष तरी कामं करावं लागणार, या विचाराने ते व्यथित झाले. त्यांचा स्वभाव कडवट व्हायला त्यांची नोकरीं पण कारण होती. वयाच्या सोळा सतराव्या वर्षांपासून ते कामं करीत होते. घरची आर्थिक परिस्थिती एवढी वाईट होती की त्यांना शिक्षण सोडून कामं करावं लागलं होतं. लग्न उशिरा झालं तेही अशा स्त्रीशी, जिला दुसऱ्या पुरुषापासून मुलं होतं. तेही लग्न करताना माहितनव्हतं. असो. विचसारांच्या गरतेतून बाहेर येऊन ते घराकडे परतले. ते घरी येताना विशाखाने पाहिलं. परंतु तिने नापसंतीने तोंड वाकडं करीत दरवाजा लावून घेतला. कारण तिला राजमानेनी एकदा झटकली होती. राजमानेंच्या हे लक्षात आलं. पण असल्या फालतू गोष्टींकडे लक्ष देण्याची त्यांची इच्छा नव्हती. आत शिरून दरवाजा बंद करून त्यांनी पायातले बूट भिरकावले आणि पॅन्ट शर्ट काढून दुसऱ्या बसजूला भिरकावीत ते आवासून बसलेल्या आरामखुर्चीत एकदाचे धपकन बसले. आता मात्र त्यांना पुन्हा मालतीची आठवण झाली. निदान ती तरी आपल्याशी प्रेमाने वागत होती. आवण मात्र तिला हिडिसफिडीस करीत आलो. आपली कितीतरी काळजी घेतं असेल ती. खरतर आपण अगदीच सुमार दर्जाचे आहोत. याची त्त्यांना प्रकर्षाने जाणीव होऊ लागली. मग ते स्वतःशीच बोलले, "आवण असेल कसे? आपल्याला कोणीच कसं आवडत नाही? खरतर मालती सारखं रत्न सांभाळायची आपली लायकी नाही."
असं म्हणून त्यांनी दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेतला... आता त्यांना भूक लागल्याची जाणीव होऊ लागली. आत जाऊन त्यांनी सगळे डबे तपासले. जुनाट पुराणं फरसाण, दोनचार कुबट बिस्कीट. आता बाहेर जाण भाग आहे आणि येताना सकाळ साठी नाश्ता पण आणावा लागेल. उद्या पासून आठवडाभर कामावर जाण्याचं टेन्शन नव्हतं म्हणा. त्यामुळे ते थोडे सुखावले. रात्रीचे साडेआठ वाजत होते. त्यांनी तोंड धुऊन कपडे घातले. जरा फ्रेश वाटलं. कुलूप किल्ली हातातून घेऊन दर उघडण्यासाठी वळले,...
तेवढ्यात कडी वाजली. त्यांनी दरवाजाशीच असल्याने पटकन दार उघडलं. बाहेर मालतीचे बाबा आणि छोटी, गोरीगोरी, दोन वेण्या घातलेली, तपकिरी डोळ्यांची पिवळा फ्रॉक घातलेली तीनसाडेतीन वर्षांची मुलगी उभी होती. तिला पाहून त्यांना बाबांचा आलेला राग नाहीसा झाला... मात्र ते त्या दोघांकडे पाहतच राहिले. त्यांना आत यायला सांगण्याचं पण ते विसरले. मग बाबांनीच विचारलं, "येऊ का आत...?"
(क्रमश:)
अरुण कोर्डे