शब्दांची नाती-गोती

शब्द चघळू या आणि शब्द कुठून आले वरून पुढे जाऊ या.


खुर्द ह्या शब्दाचा फ़ारसीमध्ये अर्थ छोटा असा होता. मराठीत ह्या शब्दापासून आणखी अनेक शब्द आले असावेत असा माझ्या कयास आहे. यापूर्वीच्या भागात बुद्रुक आणि खुर्द या शब्दांची चर्चा झाली आहे, असे वाटते. बुद्रुक म्हणजे मोठा, बुजुर्ग. खुर्द म्हणजे छोटा. जसे रेठरे खुर्द, रेठरे बुद्रुक ही कऱ्हाडजवळची दोन खेडी आहेत. असो.


शब्द - खुर्दा.
वाक्यात उपयोग - किवीजने भारतीय फलंदाजीचा खुर्दा उडविला.


शब्द - खुजा 
वाक्यात उपयोग - खुजी माणसे, खुजी दुनिया.


मराठीतला वर हा प्रत्यय फ़ारसीतल्या बर ह्या शब्दापासून आला असावा. फ़क्त फ़ारसीत प्रत्यय आधी येतात. जसे सरे-आईना म्हणजे ऐन्याच्या पुढे; पसे-आईना म्हणजे आरश्याच्या मागे; पसे-मंजर म्हणजे पार्श्वभूमी(इंग्रजीतले बॅकग्राउंड) वगैरे.


शक्य तिथे मनोगतींनी चुका दाखवाव्यात‌. असेच अनेक शब्द उलगडून दाखवावेत.