उठा उठा चिऊताई...

ह्या कवितेची कवयित्री/कवी कोण हे मला माहित नाही.

उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजुनही...

सोनेरी हे दूत आले
घरट्याच्या दारापाशी
डोळ्यावर झोप कशी
अजूनही...

लगबग पाखरे ही
गात बघा गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहिकडे...

झोपलेल्या अशा तुम्ही
आणायचे मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या...

बाळाचे नी नाव घेता
जागी झाली चिऊताई
उडोनिया दूर जाई
भुर्र भुर्र...

- अनामिका/क.