अपारंपरिक ऊर्जा स्रोत

महाराष्ट्रातील किंवा एकुणच भारतातील वीज आणि तेल टंचाई बघता; सौरउर्जा, पवनउर्जा अश्या अपारंपारीक उर्जा स्रोतांचा वापर अपरिहार्य होणार आहे. वीज ही आता जणु जीवनावश्यक गोष्ट झाली आहे. ही वीजनिर्मितीही वेगळ्या - अपारंपारीक पद्धतीने करण्याची आवश्यकता आहे.


अश्या या अपारंपारीक उर्जेचा वापर सोप्या पद्धतीने आपल्या दैनंदिन जीवनात कसा करता येईल याबद्दल मनोगतींची मते जाणून घेण्यास मी उत्सुक आहे. तसेच काही मनोगतींनी अश्या उर्जांचा वापर करण्यास सुरुवात केलीही असेल. त्यांनी आपापले अनुभव मांडावे...