भरकटणाऱ्या चर्चा

मनोगतावर (कधीकधी) कशाही भरकटत जाणाऱ्या चर्चा पाहिल्या की मायबोलीवरील राहुल फाटक यांच्या खालील लेखाची आठवण होते.


मायबोलीवर एक सी.व्ही.


खरं तर हा लेख इतका इरसाल आहे की त्याचं मनोगतीकरण करावं असं फार मनात येत होतं पण साहित्यचौर्याचा बट्टा टाळण्यासाठी की-बोर्डावरचा हात आखडता घेतला. तरीही मनोगतींना या लेखाची मजा अनुभवता यावी म्हणून इथे दुवा देण्याचा मोह टाळला नाही.


हा लेख वाचताना तुम्हालाही इथल्या (मनोगतावरच्या) अशा काही गमतीजमती आठवल्या का? कुणाचे प्रतिसाद वाचून कुणाची आठवण झाली? जरूर लिहा. (हसा आणि हसू द्या.)


                                                                      साती काळे.