((गाफ़िल))

राहू नकोस गाफिल, तो अंगणात आहे
जाईल दूर!  तो कोठे बंधनात आहे?

साऱ्या हव्याहव्याशा साड्या महाग असती
दिडकी तरी कुठे गे माझ्या खिशात आहे!

ही गाढवे बरी ! पण गाणे तुझे नको रे!
हा ताप फक्त माझ्या सहजीवनात आहे

मज कोहळा मिळावा ,पण आवळा न देता
हा ध्यास नित्य याच्या त्याच्या मनात आहे

दूरवर जात राही का वास आकळेना
काही जुने पुराणे ह्या लाडवात आहे!


हल्ली कमीच होते धरण्यास हात धाडस
भाऊ तिचाच माझ्या दृष्टीपथात आहे!


ठेवून काम मागे जातोस 'कारकूना'
काळी तुझी प्रतीमा साऱ्यां मनात आहे


(प्रेरणा- गाफिल- मिलिंद फणसे)