श्रावणघेवडा कोशिंबीर

  • बारीक चिरलेला श्रावण घेवडा २ वाट्या
  • २-३ चमचे दाण्याचे कूट
  • २-३ चमचे ओल्या नारळाचा खव,
  • २-३ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर,
  • १ मिरची, मीठ, चिमुटभर साखर,
  • अर्धे लिंबू, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद
३० मिनिटे
२ जणांना

बारीक चिरलेला श्रावणघेवडा कूकर मध्ये पाणी न घालता शिजवून घेणे. गार झाल्यावर त्यात हिरची मिरची व मीठ चुरडून घालणे. चवीप्रमाणे मीठ, चिमुटभर साखर, दाण्याचे कूट, कोथिंबीर व ओला नारळाचा खव घालणे. अर्धे लिंबू पिळणे (चवीप्रमाणे कमी-जास्ती पिळणे). नंतर त्यामध्ये वरून फोडणी घालून एकसारखे करणे.

श्रावणघेवडा = फरसबी = ग्रीन बीन्स

गणपतीत जेवताना मोदकांबरोबर डाळिंब्या व श्रावणघेवड्याची कोशिंबीर छान लागते. नुसती खायला पण छान लागते.

सौ आई