(नवे)

(नवे)
का बरे तू दिले ढकार नवे?
जाहले कोणते विकार नवे?


सोडले मी तिला... तरी देई 
ही मला का बरे नकार नवे?

आवरा भांडणास सवतींनो
वाहतो रोज मीच भार नवे


ऐकता भाव, समजलो मीही....
हा नवा माल, चढ उतार नवे

बाकडे तोडण्यास येथेही
आणले मीच गुंड चार नवे

दात गेलेत ना तुझे पडुनी?
घे चवीला उगाच सार नवे !

साखळी गंजण्यास दाराला
दे जरा पावसा तुषार नवे

मूळ रचना- नवे- कुमार जावडेकर