नवीन साडी!

 

तसे म्हणाया नवीन , अगदी नवीन होत्या बऱ्याच साड्या
परंतू काही न बोलतो मी तू आणिली जर नवीन साडी

उगाच शोधायला तिला तू किती दुकाने फिरून आली
महाग  होत्या जुन्या जश्या त्या, महाग होती नवीन साडी


हजारदा त्या बिलोरी मॉलापुढे बसूनी रडून घेतो
तुझ्या कशाला मनात भरली ती टांगलेली नवीन साडी ?

अजूनही हे कपाट बघूनी पुन्हा पुन्हा बुचकळ्यांत पडतो
पहा कधीही, तुडुंब गर्दी तरी कशाला नवीन साडी?

 टिव्हीवरी तुलसी नी पार्वती नटूनी अश्रू कशा ढाळती
हरेक भागासवे दिसावी तुला तयांची नवीन साडी

अता न हातांमधील पैशांवरी राहिला मुळी भरोसा
जुनाच सदरा मी घालतो मग तू घेतली जर नवीन साडी

 

                                                                      साती काळे.

 आधारित!