सूरत बदलनी चाहिये...

          शिवधर्म काय आहे याची ऐकीव माहिती असलेल्या बऱ्याच लोकांना शिवधर्मला फक्त हिंदू धर्माला शिव्या देणाऱ्या लोकांचा एक समुह एवढंच समजतात . यात त्यांची काही चूक आहे असंही नाही. कारण प्रसारमाध्यमांमधून त्यांना जेवढं ऐका-वाचायला मिळतं  त्यातून शिवधर्माची अशी प्रतिमा निर्माण होणं काही आश्चर्याची गोष्ट नाही. आणि प्रसारमाध्यमे कुणाच्या ताब्यात आहेत ही काही पुन्हा सांगण्याची गोष्ट नाही.           आज पहिल्यांदा या मुक्त मंचावरून शिवधर्माचा आवाज लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही शिव हे नाव घेऊन जगासमोर येत आहोत. शिव म्हणजे सत्य, सुंदर ! आता सत्य सांगणे याला कुणी शिव्या देणे असं म्हणत असतील तर तो त्यांच्या पुर्वाग्रहाचा प्रश्न आहे.


हिंदू धर्मात समानता नाही असं म्हणणे म्हणजे शिव्या देणे असं जे समजत असतील ते वस्तुस्थितीकडे पाठ फिरवत आहेत असेच म्हणावे लागेल. आणि शिव्या देऊन परिवर्तन होत नसते याची जाणिव आम्हाला नसेल असाही गैरसमज कुणी करून घेत असेल तर मग प्रश्नच नाही.


दुष्यंतकुमार यांचा एक शेर मला आठवत आहे -


सिर्फ़ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं


मेरी कोशीश हैं की ये सूरत बदलनी चाहिये


आणखी काय सांगू?