मित्र हो,
हा विषय मुद्दाम चर्चेसाठी मांडत आहे. अनुच्या लेखनाचा याच्याशी काही एक नाते नाही. म्हणजे प्रसिद्धीसाठी लिहिलेले नाही हे आधीच नमुद करतो.
अलिकडची जागतिक पातळी वरची हालचाल, अनेक देशातले दहशतवादी हल्ले, प्रत्येक देशाचा स्वतंत्र अण्विक कार्यक्रम, काही देशांकडुन दहशत वादाचे उघड उघड समर्थन आणि त्या देशांचा धार्मिक विचार. तेलाच्या अकारण वाढत्या किमती, अमेरिकेची उघड उघड चालणारी दादागिरी .... असे अनेक मुद्दे जे अलिकडे खुप स्फ़ोटक बनले आहेत.
इतिहास पहाता हि महायुद्धाची पार्श्वभुमी बनते आहे. मला असे वाटते आहे कि लवकरच तिसरे महायुद्ध पेटेल...
आपल्याला काय वाटत? आपली मते मांडा, मुद्द्याचे खंडन करा, व्यक्तिचे नको...
चाणक्य