विज्ञानाची प्रगती कितपत बरोबर ?

नमस्कार !


लहानपणी शाळेत असताना एक निंबंधाचा विषय हमखास असायचा की विज्ञान शाप की वरदान ?'


तेव्हा मी खूप विचार करायचो की खरोखर विज्ञानाने मानवाला कितपत फायदा झाला? की किती नुकसान झाले.


मी मात्र एकच पवित्रा घ्यायचो की विज्ञानाने नुकसान केले आहे. मग माझे मित्र माझ्याशी वाद घालायचे की विज्ञानामुळे आपल्या आरोग्याची सोय झाली वगैरे..


मग माझे म्हणणे असायचे की आपण किती आळशी झालो आहोत..आपले आयुमान त्यामुळे कसे घटत चालले आहे..


माझ्यामते आपली 'बारा बलुतेदार' परंपरा किती बरोबर आणि परिपूर्ण होती.


तुमचे काय मत आहे याबाबत?