॥ यजुर्वेद ॥

यज्ञयागाचे सर्व मंत्र यजुर्वेदात दिलेले आहेत. या वेदाला कर्मकांडांचा वेद असेही म्हणतात. वायु नावाच्या ऋषिंनी यजुर्वेदाचे मंत्र संकलित केले आहेत असे मानतात. वायु हे चैतन्याचे सुद्धा प्रतिक आहे. यजुर्वेदात यज्ञाला सर्वोत्कृष्ट कर्म मानले गेले आहे. यज्ञवेदीवर यज्ञाचे मंत्र म्हणण्याऱ्या पुरोहिताला अध्वर्यु असे संबोधतात.

यजुर्वेदाचे वर्गीकरण खालीलप्रमाणे. संहिता, उपासना आणि मंत्रोच्चारणाच्या पद्धतीवरून असे वर्गीकरण केले असावे. 

 - शुक्ल यजुर्वेद
        - माध्यंदिन
        - कण्व
 - कृष्ण यजुर्वेद
        - तैतेरीय
        - मैत्रयिणी
        - कथक
        - कपिष्ठलकथा
महत्त्व
 यजुर्वेदात सर्व सोळा संस्कारांचे मंत्र दिले आहेत. यात मनुष्यजातीच्या कल्याणासाठी म्हणून जे प्रसिद्ध यज्ञ केले जातात त्याच्या विधी व मंत्र दिले आहेत. जसे
 - अश्वमेध
 - नरमेध
 - सर्वमेध
(मेध याचा अर्थ त्याग अथवा बळी असा नसून तो कल्याण असा आहे.)

यजुर्वेदातील देव
प्रजापति, रुद्र, विष्णू वगैरे ऋग्वेदातले देव येथे यजुर्वेदात एवढे महत्त्वाचे नाहीत. तर शिव, शंकर, महादेव हे देव अधिक महत्त्वाचे!
शिव - ही कल्याणाची देवता आहे
शंकर - ही नद्यांची देवता आहे
महादेव - म्हणजे देवाधिदेव. सर्व चराचराच्या कल्याणाची देवता. तशी विष्णूचीही पूजा यजुर्वेदात केली जाते.
असूर - ऋग्वेदात हे बलिष्ठ देव म्हणून ओळखल्या जातात, पण जसा त्यांचा यजुर्वेदात प्रवेश होतो, तशी ही मंडळी महाभयंकर राक्षस म्हणून गणल्या जातात.
नाग - ही पण यजुर्वेदातली देवता, ऋग्वेदात नागदेवतेचा उल्लेख आढळणार नाही.

आता या लेखनाचा शेवट यजुर्वेदातल्या प्रार्थनेने करू या:


ॐ स्वस्ति नः इंद्रो वृद्धश्रवः
स्वस्ति नः पुषाः विश्ववेदा:
स्वस्तिनस्तार्क्षोरिष्टनेमि
स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॥


ॐ शांति शांति शांतिः


(यजुर्वेदी पद्धतीप्रमाणे ष चा उच्चार ख असा होतो आणि य चा ज)


अर्थ: जो सर्व चराचरांचे ऐकतो, जो सामर्थ्यशाली आहे, जो सर्वज्ञ आहे, जो अश्वाप्रमाणे चपळ आणि बृहस्पति (प्रमाणे ज्ञानी) आहे, तो सर्वांचे कल्याण करो.


                                        ॥ शुभम भवतु ॥


संकलित. काही चूक आढळल्यास जाणकारांनी कृपया सांगावे. जमल्यास पुढच्या भागात ऋग्वेद. धन्यवाद.