(गळाभेट)

मला कळलेच नाही का अशी बिलगायला आली
गळाभेटीस आली की खिसा कापायला आली


हिला मी का विचारू जाब भारंभार नवऱ्यांचा
जशी साडी तशी केवळ पती बदलायला आली


कशाला शुद्ध प्रेमाची तिच्या मी पाहिली स्वप्ने
जरासे टाकले पैसे तशी चुंबायला आली


अशी ही यायची येथे मला सांगायची वेडी
कशी त्याच्याकडे तीही मला विसरायला आली


अजूनी अन्न जे माझे जरासे राहिले होते
बघा ते खरकटेही ही कशी उचलायला आली


अगो बाई नको लाजू हवे ते माग तू आता
(मला कित्येक दिवसांनी कुणी भेटायला आली)


वैभव जोशी ह्यांच्या गळाभेट वर आधारित