ज्येष्ठ मनोगती जयंत ह्याची माफी मागून पुन्हा एकदा प्रेमकाव्य पोस्ट करतेय. मोठ्या मनाने ते क्षमा करतील ह्याची आशा नव्हे खात्री आहे. काय करणार..... दिल है के मानता नही.......
प्रेम समर
पाहू नकोस ना रे
मजसी असा गडे तू
मी विरघळून जाते
समजून घे जरा तू
आमंत्रणे तुझी ती
नजरेतूनीच येती
निःशब्द आर्जवे ती
डोळेच व्यक्त करती
करी पाठलाग माझा
मिश्किल भाव त्याचे
हळुवार सोडती ते
शर प्रेम बंधनाचे
लटका विरोध आता
किती वेळ भासवू मी
ओढाळ या मनाला
किती वेळ थांबवू मी
तू जिंकलास जानू
हरले तुझी प्रिया मी
समरात या मनाच्या
हरुनीही जिंकले मी