दाण्याची आमटी

  • १ वाटी भाजलेले दाणे
  • १ चमचा साजूक तूप, १ तिखट मिरची
  • २ चमचे चिरलेली कोथिंबीर, २ चमचे खवलेला ओला नारळ
  • १ चमचा जिरे, अर्धी वाटी चिंचेचे दाट पाणी
  • गूळ छोट्या सुपारीइतका
  • चवीपुरते मीठ
३० मिनिटे
२ जणांना

१ वाटी भाजलेल्या दाण्याची साले काढून मिक्सरमध्ये बारीक कूट करून घेणे. नंतर त्यात पाणी घालून मिक्सरमधेच गंधासारखे बारीक वाटून घेणे.  तूपजिऱ्याची फोडणी करून त्यामध्ये मिरचीचे तुकडे व गंधासारखे बारीक झालेले दाण्याचे मिश्रण घालून त्यात चिंचेचे पाणी, गूळ, कोथिंबीर, ओला नारळ व चवीपुरते मीठ घालून आवश्यकतेनुसार पाणी घालणे व उकळी आणणे. पातळ/दाट ज्याप्रमाणे आमटी आवडते त्यानुसार पाणी घालणे.

अमेरिकेत dry roasted peanuts मिळतात ते वापरले तरी चालेल म्हणजे दाणे भाजण्याचा व सोलण्याचा त्रास वाचेल.

ही आमटी वऱ्याच्या तांदुळाबरोबर खातात जसे की आमटी भात.

रोहिणी

ह्याबरोबर बटाट्याची उपासाची भाजी, खमंग काकडी किंवा लाल भोपळ्याचे  भरीत व नारळाची ओली चटणी खाणे. गरम गरम वऱ्याच्या तांदुळावर दाण्याची आमटी व त्यावर साजूक तूप. उपासाला करतात.

सौ आई