मराठी भाषांतराची गरज कितपत ?

काही महिन्यापासून मनोगत वर अथवा जेव्हा पासून मनोगत चालू झाले तेंव्हा पासून विविध क्षेत्रामधील इतर भाषेचे शब्द व त्यांचे मराठी करण हा विषय घोळतो आहे. त्यावर माझे मत.


खरोखरचं ह्या सर्वाची गरज आहे का ? कारण तुम्ही वापरत असलेल्या संकेतस्थळाचेच उदा. ह्या ह्याच्या सर्व प्रणाली English मध्येच कार्य करतात पण प्रदर्शन मराठी असते. जसे की जे शब्द भाषांतरी होउ शकतात ते करा पण जे साध्य  नाही अथवा  अर्थाचा अनर्थ होईल असे भाषांतर काय कामाचे ? उदा. येथेच मनोगतावर काही शब्द English मध्येच आहेत नाहीतर मनोगत कारांना हे काही अवघड नाही आहे कि त्याचे भाषांतर करणे  पाहा.  Input Format, HTML, Ctrl_T असंख्य आहेत. , Mobile phone ला दुरध्वनी हा शब्द खरोखरच उपयुक्त आहे पण त्याचा व्यवहारिक उपयोग करता येईल का ? कारण मोबाईल ला फक्त दुरध्वनी बोलल्याने अथवा लिहण्याने  काम चालणार नाही त्याच्या सलग्न बाबी तुम्हाला भाषांतरीत  कराव्या लागतील. नाही तर एकादे वाक्य योग्य तयार होनारच नाही. ही फक्त उदाहरणे आहेत.


सर्वच्या सर्व प्रणालीचे / शब्दाचे / रोजच्या वापरातील शब्द ह्याचे मराठी करण साध्य नाही व महत्त्वाचे देखील नाही. काही शब्द असे देखील आहेत जे मराठी मध्ये नाही आहेत अथवा त्यांचे मराठी करण साध्य नाही. जसे की, Modem, Harddisk , RAM, printer, Modules, Moniter. काही लोक शब्दांसाठी काही शब्द सुचवतील जसे मुद्रण यंत्र . पण जेव्हा आपण सामान्य उपभोगता हाच विचार करतो तेंव्हा मला नाही वाटत की ती लोक अथवा आपण स्वतः लोक वापरू शकतो एकाद्या संकेतस्थलावर ह्यांची चर्चा करणे अथवा शब्द बनवणे सोपे आहे पण व्यवहारात वापरणे असाध्य असेच आहे. समजा तुम्ही एक संगणक सेवा विक्रेता आहात व आपण सामान्य ग्राहकाला आपल्या उत्पादना संबंधी माहिती देत आहात.


विक्रेता: "साहेब, हा अबक संस्थेचा १०१० प्रकाराचे मुद्रण यंत्र आहे, ह्याची प्रत्येक मिनिटाला १५ पान मुद्रित करण्याची क्षमता आहे."


ग्राहक : गोंधळलेला असेल कारण त्याने printer साठी मुद्रण- यंत्र अथवा तस्म नाव कधीच वापरले अथवा वाचलेले नाही अथवा तो समजेल की हा विक्रेताला खुळं लागले आहे.


पण तोच विक्रेता : " साहेब हा अबक कंपनीचा १०१० printer आहे व ह्याचा RPM हा १५ पान आहे."


ग्राहक : लगेचच समजेल की विक्रेता हा अबक कंपनीचा विक्रेता आहे व 1010 printer विकण्यासाठी उभा आहे.


भारतामध्ये ग्राहकांच्या ३ विभाग आहेत.


१. सामान्य उपभोगता : ५०% चान्स आहे की हा उपभोगता तुम्ही केलेले भाषांतर समजेल अथवा समजवून घेईल कारण हा जमीनीवरचा सामान्य माणूस असेल.


२. नवश्रीमंत उपभोगता : ह्यांच्या विषयी काय सांगावे हा फक्त हवेतच असतो आपल्या श्रीमतींचा रोब मारण्यासाठी तो आपली भाषा सोडून इतर भाषेचा आधार घेत असतो. तो जरी समजला असेल की तुम्हाला काय सांगायचे आहे तरी ही नखरे करेल व तुम्हाला त्याच्या बोली भाषेमध्ये भाष्य करायला लावेल.


३. गर्भ-श्रीमंत उपभोगता : हा तर असा हावभाव करतो की मराठीशी ह्यांचे काहीच देणं घेणे नाही , भाताला देखील राईस व मिरचीला देखील चिली बोलतो.


वरील विश्लेषण मी माझ्या स्व अनुभवातून केलेले आहे.


एके जागी वाचलेले आठवते एकाद्या भाषेचा उत्कर्ष हा त्याच्या व्यवहारातील वापरांवर अवलंबून आहे. उदा. प्राचीन मोडी लिपी, संस्कत. ह्यांचा साहीत्यीक आवाका खूपच मोठा होता पण त्या भाषा सर्वसामान्य लोकांसाठी उपयोगी नव्हत्या अथवा उपयोग करणे साध्य नव्हते.


येथे मी माझे फक्त मत मांडले आहे.


आपण असे करु शकतो की जे शब्द रुळलेले आहेत ते तसेच मराठीमध्ये वापरावेत. जे नवीन तंत्र येइल त्या चे भाषांतर करुन मगच ते तंत्र/सेवा लोकांसमोर ठेवावी जेणे करुन सामान्य लोकांना त्याच्या वापराबद्द्ल अडचण येणार नाही.