चिकुनगुनिया

असले काही रोग शहरात रहाणाऱ्यांना होत नाहीत, अशा गैरसमजात होतो. गेल्या आठवड्यात अचानक थंडी वाजून ताप आला. अंगभर लालसर पुरळ उठले. असह्य खाज सुटली. दुसऱ्या दिवशी हाताच्या पेरांपासून सगळे सांधे दुखू लागले.  शेवटी हाच तो चिकुनगुनिया असा साक्षात्कार झाला.
हा डासांच्या माध्यमातून होणारा विषाणूजन्य रोग आहे. याला ऍलोपॅथीत खास असा उपचार नाही. होमिओपॅथीत काही औषधे आहेत, आयुर्वेदात आमपाचकवटी आणि महासुदर्शन काढा याचा फायदा होतो म्हणे. पण हा रोग शक्यतो होऊ नये म्हणून प्रयत्न करणेच श्रेयस्कर. डास चावू नयेत याची खबरदारी घेणे आवश्यक.
हा काही प्राणघातक रोग नाही, पण त्रासदायक नक्कीच आहे. विशेषतः खाज आणि सांधेदुखी फारच इरिटेटिंग. सांधेदुखी काही लोकांमध्ये नंतर काही वर्षे रहाते, असे ऐकून आहे.
मनोगतींनो, स्वतःला यापासून वाचवा. काळजी घ्या.