हवे-नको ते...


हवे-नको ते सगळे येथे घडून गेले
माझे जगण्यामधले मन पण उडून गेले...


स्वप्ने गंधित झाली अन मी मोहरलो
प्राजक्ताचे सडे पहाटे पडून गेले...


सरावलो मी इतका वरवर हसण्याला
अश्रू माझे डोळ्यांआडच दडून गेले...


शंकांचे मी निरसन केले जरी तुझ्या
तेच प्रश्न मज पुन: नव्याने पडून गेले...


'अजब' वसंता शिवारावरी तुझी कृपा!
फूल-फूल अन पान-पान बघ झडून गेले...