घरच्या घरी एस्प्रेसो कॉफी (यंत्राविना)

  • १ कप गरम दूध,
  • १ छोटा चमचा कॉफी (इंस्टंट),
  • दीड चमचा साखर
१५ मिनिटे
१ जण

१. एका काचेच्या पेल्यात (पेलाच घ्यावा कारण ह्या कॉफीचा फेस खूप होतो) दीड चमचा साखर व कॉफी घ्यावी.

२. या मिश्रणात एक चमचा पाणी टाकून हे मिश्रण ५ ते ७ मिनीटे चांगले घोटावे.

३. घोटल्यानंतर हे मिश्रण फिकट तपकीरी रंगाची पेस्ट (मराठी शब्द??) होईल.

४. पेस्ट झाल्यानंतर या मिश्रणात एक कप गरम दूध (थोड्याशा उंचीवरून) टाकावे.

५. तयार झालेली कॉफी ४-५ सेकंद तशीच ठेवावी. आता या कॉफीवर २-३ सें.मी. फेस आलेला दिसेल. हा फेस तुम्ही चमच्याने खाऊ शकता.

 

घरच्या घरी बनवीलेल्या एस्प्रेसो कॉफीचा आनंद लूटा!!!!!

असीम, माझा मित्र!!