प्रतिइतिहास

          चंद्रशेखर शिखरे यांचे प्रतिइतिहास हे पुस्तक जिजाई प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आले आहे. शिवयारांच्या आयुष्यावर झगझगीत प्रकाश टाकणारे हे पुस्तक खरच अभ्यासपुर्ण आहे. या पुस्तकास आ. ह. साळुंखे यांची प्रस्तावना लाभली असून पुरुषोत्तम खेडेकर यांनीसुद्धा या पुस्तकाच्या सुरुवातीस आपले मनोगत स्पष्ट केले आहे. स्वतः लेखकाने प्रति इतिहास हे नाव ठेवण्यामागची व एकंदरीतच पुस्तक लिहिण्यामागची भुमिका स्पष्ट केली आहे.


१) Hindu king and Islamic India चे मिथक.


     या भागामध्ये शिवाजीराजे खरंच फक्त हिंदुंचे राजे होते का? त्यावेळचा भारत खरंच इस्लामिक होता का? यासारख्या प्रश्नांचे साधार विवेचन केले आहे. James Lane  सारख्या परकीय लेखकच्या लेखनामागे कोणती प्रेरणा असावी? या मुद्द्यावर तर्कपुर्ण विवेचन केले आहे.


गोब्राह्मणप्रतिपालक की कुळवाडीभूषण?,शिवराज्याभिषेकाचा वाद, शिवरायांचे खरे गुरू, रामदासांना शिवरायांचे गुरू बनवण्याचा कट, स्वनामधन्य शिवशाहीर ब.मो.पुरंदरे, ई. भाग मुळातून वाचावे असेच आहेत.