भाषेत अपभ्रंश कसे होतात

सध्या म. श्री. दीक्षित लिखित "आम्ही चित्पावन" हे पुस्तक वाचतो आहे. त्यांच्या मते चित्पावन हा शब्द क्षितिपावन या शब्दापासून बनला. त्यांनीच चर्चा केल्याप्रमाणे हा शब्द 'चिपळूण' शब्दापासून अपभ्रंश स्वरूपात रूढ झाला असल्याचेही काहींचे मत आहे. क्षितिपावनपासून चितिपावन>चित्तिपावन>चित्तापावन>चित्तपावन>चित्पावन अशा क्रमाने व्युत्पत्ती मिळू शकते. मात्र चिपळूण शब्दापासून चित्पावन हा अपभ्रंश कसा झाला हे कळू शकत नाही. मूळ शब्दाचा अपभ्रंश बनण्याची क्रिया कशी असते याविषयी कोणी माहिती देऊ शकेल का?


अवधूत.