तुझ्या हव्या हव्याशा चेहर्‍याला

तुझ्या हव्या हव्याशा चेहर्‍याला

तुझ्या हव्या हव्याशा चेहर्‍याला, कुणाची न दृष्ट लागो, नेत्रसुखदे |
चेहर्‍यास करी पदराआड, माझीही न दृष्ट लागो, नेत्रसुखदे || धृ ||

अशी न एकटी कधी फिरू, नजरांना सर्वच लाग भिऊ |
फुलाहूनी बहू नाजुक असशी, जपून चाल तू हळू हळू |
केसांना सोड गालांवर तू, कधी ऋतुची न दृष्ट लागो || १ ||

दर्शन एक मिळे ज्याला, तिथेच प्रवासी तो थांबला |
पाहून सुंदर रूप तुझे, तो चंद्रही चेहरा लपवू पाहे |
कधी पाहू नको तू आरसा, स्वत:ची न दृष्ट लागो || २ ||

तेरी प्यारी प्यारी सुरत को ह्या मूळ हिंदी गीताचा मराठी अनुवाद.

मूळ हिंदी गीत: हसरत जयपुरी, संगीत: शंकर-जयकिसन, गायक रफी
चित्रपट: ससुराल, भूमिका: राजेंद्र कुमार, सरोजादेवी

मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००६१०२१