आगळावेगळा पक्षी - ४

 दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील पेंग्विन्स


या मालिकेतील शेवटच्या लेखात आपण आफ्रिकेतील तसेच ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील पेंग्विन्सची माहिती पाहू.


आफ्रिकन पेंग्विन्स
आफ्रिकन पेंग्विन्स हम्बल्ट पेंग्विन्ससारखे दिसतात. त्यांची उंची सर्वसाधारणपणे २७ इंच असते आणि वजन अंदाजे ७ ते ११ पौंड असते. हे दक्षिण आफ्रिकेत केप ऑफ गुड होपच्या जवळपास आढळतात.  

africamap

 तेलगळतीने ह्यांची संख्या झाली आहे त्यामुळे त्यांचे रक्षण व्हावे म्हणून आता आफ्रिकन पेंग्विन हे आरक्षित आहेत. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या व कित्येकदा होणाऱ्या तेलाच्या गळतीने अनेक पेंग्विन मरण पावतात ; त्यांची संख्या कमी होते. ते रोखण्यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत.

africa2

आफ्रिकन पेंग्विन्स ह्यांची घरटी एकमेकांपासून बरीच दूर दूर तयार करतात. झाडाखाली किंवा वाळूत हे पेंग्विन घरटे करतात. आफ्रिकन पेंग्विनची मादी एका वेळी दोन अंडी देते.  अंड्यातून पिलू बाहेर येण्यास ३८ते ४१ दिवस लागतात. नर व मादी आळीपाळीने अंड्याचे रक्षण करतात. अंदाजे ४० दिवस दोघेही आपल्या पिलांची काळजी घेतात. जवळजवळ १०० दिवसांचे झाले की पिलांच्या पंखात पुरेशी शक्ती येते व ते स्वावलंबी होतात हिंडू फिरू शकतात व आपले अन्न मिळवू शकतात. स्वतःचे रक्षण करू शकतात.


ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील पेंग्विन्स


ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये पुढील प्रकारचे पेंग्विन्स आढळतात.

austramap1

लाल ठिपके   -         यलो आइड पेंग्विन्स
निळे ठिपके-             लिटिल पेंग्विन्स
काळे ठिपके-             स्नेअर्सलंड पेंग्विन्स
हिरवे ठिपके-             इरेक्ट क्रेस्टेड
नारिंगी ठिपके-            रॉकहॉपर पेंग्विन्स
जांभळे गुलाबी ठिपके-   फिओर्डलंड पेंग्विन्स

यापैकी रॉकहॉपर पेंग्विन्सची माहिती आपण करून घेतली आहे.


'लिटिल पेंग्विन्स'
'लिटिल पेंग्विन्स' ऑस्ट्रेलियात आढळतात तसेच न्युझिलंडमध्येही ह्यांची संख्या बरीच आहे. ह्यांनाच' लिटिल ब्लु पेंग्विन्स ' किंवा 'ब्लु पेंग्विन्स' असेही म्हणतात. ह्यांच्या नावाप्रमाणे हे सर्वात लहान पेंग्विन्स आहेत. ह्यांची उंची १६-१७ इंच असते व ह्यांचे वजन अंदाजे २ पौंड असते. ह्या पेंग्विनच्या लिटिल पेंग्विन व व्हाईट फ्लिपर्ड अशा दोन उपजाती आढळतात.  लिटिल पेंग्विन्सना ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंडच्या किनाऱ्यालगत आढळणारे गरम पाणी आवडते. दगडांच्या फटीत ते घरटे करतात. किंवा वाळूत खोल खड्डा करून त्यात आपली अंडी घालतात.


little3


 



फीऑर्डलंड पेंग्विन्स
हे पेंग्विन्स लाजरे आणि घाबरट असतात. न्यूझीलंडच्या पश्चिम किनाऱ्यावर हे पेंग्विन्स आढळतात. घनदाट झाडीमुळे ह्यांचा व ह्यांच्या घरट्यांचा अधिक अभ्यास करणे कठीण जाते. सगळ्या क्रेस्टेड पेंग्विन्सप्रमाणे ह्यांना सुद्धा
चोचीपासून तर डोळ्यापर्यंत लांब पिवळ्या रंगाच्या पिसांचा एक पट्टा तयार झालेला दिसतो. तसेच ह्यांची शेपटी सुद्धा दाट पिसांची असते. पेंग्विन्स त्यांचे घरटे घनदाट झाडीत व इतर पक्ष्यांच्या घरट्यांपासून दूर तयार करतात. fiord3 दोन अंडी जरी घातली तरी बरेचदा फक्त एका अंड्यातले पिलूच जगते. नर आणि मादी आळीपाळीने दीड महिना घरट्याची काळजी घेतात. अंड्यातून पिलू बाहेर आले की काही काळ त्याला एकटे सोडूनही अन्न शोधायला जातात. त्यावेळी अशी एकटी पिले एकत्र राहतात.  साधारण ७५ दिवसाने पिले स्वतंत्र राहतील एवढी मोठी होतात.


स्नेअर्स आयलंड पेंग्विन्स
न्यूझीलंडच्या दक्षिण किनाऱ्यावर स्नेअर्स आयलंड पेंग्विन्स आढळतात. ह्यांना व जाड अशी चोच असते. ह्यांच्या तुऱ्याची पिसे पांढरी असतात व त्याच्या भोवती काळी पांढरी पिसे ह्यांच्या गालाजवळ असतात.


snare5


हे पेंग्विन्स ५०-६० सें.मी उंच असतात व ह्यांचे वजन ३-४ किलो असते. ह्यांचे घरटे जमीनीवर खड्ड्यात असते. एका अंड्यातून पिलू येते व नर मादी आळीपाळीने ते मोठे होऊन आपले अन्न मिळवू शकेपर्यंत त्याची काळजी घेतात. 


इरेक्ट क्रेस्टेड पेंग्विन्स
इरेक्ट क्रेस्टेड पेंग्विन्सना लांब मऊ पिसे असतात जी पिसे ताठ उभी राहू शकतात. ह्यामुळे हे पेंग्विन्स सहज ओळखता येतात. इतर कोणत्याही क्रेस्टेड पेंग्विन्सना अशी पिसे असली तरी ती ताठ करता येत नाहीत वा खाली वर उचलता येत नाहीत. हे पेंग्विन्स कळपाने राहतात. erect3 रॉकहॉपर पेंग्विन्सच्या कळपांजवळ हे पेंग्विन्स आपली घरटी करतात. ह्यांच्या घरट्यांचा अधिक अभ्यास करणे कठीण असले तरी त्या भागात आढळणाऱ्या इतर क्रेस्टेड पेंग्विन्स प्रमाणे ह्यांचे प्रजोत्पादन व पिलाचे संगोपन केले जात असावे असे अनुमान काढता येते.  

यलो आइड पेंग्विन्स
एम्परर पेंग्विन्स आणि किंग पेंग्विन्स यांनंतर यलो आइड पेंग्विन्स हे आकाराने तिसऱ्या क्रमांकाचे पेंग्विन्स. ह्यांचे वजन १० ते १३ पौंड असते. त्यांच्या पिवळ्या नारिंगी मांजरी सारख्या डोळ्यांमुळे त्यांना यलो आइड असे नाव दिले आहे. चोचीपासून तर डोळ्याच्या सभोवती असणाऱा पिवळा पिसांचा पट्टा हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.


yellow1


ह्या पेंग्विन्सची संख्या जगात खूप कमी आहे.  हे पेंग्विन्स दोन अंडी घालतात. कित्येकदा दोन्ही पिले जगतात. अंड्यातून पिलू बाहेर येण्यास ३९ ते ५१ दिवस लागतात, त्यावेळी नर मादी आळीपाळीने अंड्यांचे संरक्षण करतात. दोघेही पिलाची साधारण ४० दिवस काळजी घेतात. पालकांपैकी एका वेळी एक जण पिलाजवळ राहतो. पिले पालकांजवळ राहतात; ती इतर पेंग्विन्सप्रमाणे लहान पिलांचे कळप तयार करत नाहीत. मजबूत पंख तयार झाले की ही पिले स्वतंत्र राहू लागतात. 


वाचकांना पेंग्विनविषयी अधिक माहिती इथे जरूर लिहावी. सर्व वाचकांचे व प्रतिसाद देणाऱ्यांचे आभार.