आगळावेगळा पक्षी- २

अंटाक्टिका भागातील पेंग्विन्स


अंटार्क्टिका भागात पेंग्विनच्या एम्परर, जेंटू, ऍडली व चिनस्ट्रॅप ह्या जाती आढळतात .








antmap2
वरील नकाशात रंगीत ठिपके पुढील माहिती देतात.
निळे ठिपके- एम्परर पेंग्विन्सची वस्ती
लाल ठिपके-ऍडली पेंग्विन्सची वस्ती
नारिंगी ठिपके- जेंटू पेंग्विन्सची वस्ती
गुलाबी- जांभळे ठिपके- चिनस्ट्रॅप पेंग्विन्सची वस्ती


एम्परर पेंग्विन्स


त्यापैकी अंटार्क्टिका भागात राहणारे एम्परर पेंग्विन्स हे जगातील आकाराने सर्वात मोठे पेंग्विन्स आहेत.


 


emperor7


(आम्हाला हे पेंग्विन्स खूप देखणे वाटतात.)


 -६० डिग्री सेल्सियस एवढ्या कमी तापमानात हे पेंग्विन्स जगू शकतात. ते साधारणपणे ४ फूट उंच असून त्यांचे वजन अंदाजे ९० पौंड असते. त्यांचे सरासरी आयुष्य सर्वसाधारणपणे २० वर्षे असते. ४थ्या वर्षापासून हे पक्षी प्रजोत्पादन करू शकतात.


त्यांच्या शरीराचा आकार त्यांना ह्या थंड भागात जिवंत राहण्यास मदत करतो. ह्यांचे पंख आखूड असतात. त्यामुळे पाण्यात मोठे मासे पकडण्याकरता हे ९०० फुटांपर्यंत खोल उडी मारू शकतात. लेपर्डसीलपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ते ताशी १०-१५ कि.मी. वेगाने पोहू शकतात.


  एम्परर पेंग्विनची मादी एक मोठे अंडे देते. त्यानंतर मादी अन्नाच्या शोधार्थ दूर जाते. त्या अंड्याची काळजी अंदाजे ९ आठवडे नर घेतो. आपल्या पायावर ते अंडे घेऊन असे नर घोळक्याने किंवा कळप करून उबवत असतात.  त्याच्या बाहेरील पंखाच्या आतल्या बाजूला ह्या पक्ष्यांना आणखी एक ऊबदार आवरण असते ज्यामुळे त्यांचा थंडीपासून बचाव होतो. अंड्याचे रक्षण करताना उपाशी राहिल्याने नराने वजन जवळजवळ अर्धे कमी होते. सह्या महिन्यात ह्यांच्या पिलांची पूर्ण वाढ होते. त्यावेळीच उन्हाळा सुरू होण्याच्या बेतात असतो. त्यावेळी हे सर्व पेंग्विन्स समुद्रात परत येतात.  ह्या पक्ष्यांच्या शरीरावर तेलकटपणा जास्त असतो ज्यामुळे त्यांचे शरीर पाण्यात कोरडे राहते.


जेंटू पेंग्विन्स


जेंटू पेंग्विन्सचे घरटे वाळूच्या व खडकाळ किनाऱ्यावर असते. ते दगड, छोटे खडे, गवत, काड्या असे जे चटकन मिळेल ते साहित्य घेऊन आपले घरटे बांधतात. घरटे बांधण्याकरता एकमेकांचे दगड व उपयुक्त साहित्य हिसकावून घेण्यासाठी कित्येकदा ते आक्रमत होतात व प्रसंगी लढतातही. ह्यांची पिले साधारण ३० दिवस घरट्यात राहतात. अंदाजे १०० दिवसात त्यांची पूर्ण वाढ होते व ते स्वावलंबी होतात.



gent3


ऍडली पेंग्विन्स


ऍडली पेंग्विन्स हे ह्या खंडात राहणारे व सर्वात लहान आकार असणारे पेंग्विन्स आहेत.


 


adelie5


ह्यांची उंची २८ इंच असून, वजन अंदाजे ४ किलो असते. हजारो पेंग्विन्सच्या कळपात हे खडकाळ किनाऱ्यावर आपले घरटे बांधतात . ह्या पेंग्विन्सची लांब शेपटी खूप ताठ असते. हे पक्षी चालत असताना शेपटीवरील पिसे जमिनीवर घासत जातात. ह्यांचे पोट पांढरे असून डोके आणि पाठ काळ्या रंगाची असते. ह्यांच्या डोळ्याभोवती एक पांढरे वर्तूळ असते. आपल्या पोटाने रेती, छोटे दगड व भुसभुशीत बर्फ बाजूला करत हे पेंग्विन्स वाट काढतात व एका ठिकाणाहून दुसरीकडे जातात.


इतर पेंग्विनसप्रमाणे ह्यांच्यातील नर अंड्याचे रक्षण करतो, नर व मादी दोघे आळीपाळीने पिलासाठी अन्न शोधून आणतात. ऍडली पेंग्विन्सचे पिलू इतर पेंग्विन्सपेक्षा लवकर मोठे होते. पण आपल्या पिलाचे व घरट्याचे रक्षण  असल्यामुळे ऍडली पेंग्विनना सर्वाधिक करावे लागते कारण लहान आकार असल्याने त्यांना बऱ्याच प्राण्यांपासून धोका असतो.


हे पेंग्विन्स पाणी पिण्याऐवजी बर्फ खातात.
 
चिनस्ट्रॅप पेंग्विन्स


चिनस्ट्रॅप पेंग्विन्स ह्यांची  जगात सर्वाधिक संख्या आहे.



chin2


 अंटार्क्टिका भागात चिनस्ट्रॅप पेंग्विन्स  मोठ्या संख्येने आढळतात.  ते प्रचंड मोठे कळप करून राहतात. बरेचदा हे समुद्रातील मोठ्या हिमनगांवरही राहतात. हे सर्वात धीट पेंग्विन्स आहेत आणि कित्येकदा इतर पेंग्विनशी लढतातही. हे आपल्या सहकाऱ्यांना ज्या कर्कश व विशिष्ट आवाजात साद घालतात त्यामुळे त्यांना 'स्टोन क्रॅकर ' असे नाव दिले आहे.


वाचकांनी ह्या पेंग्विनविषयी अधिक माहिती मिळाली तर इथे जरूर द्यावी. पुढील भागात दक्षिण अमेरिकेतील पेंग्विन्सची माहिती पाहू या.



संदर्भ:
आइस कॉन्टिनंट-अ स्टोरी ऑफ अंटार्क्टिका - लुइस यंग