पुणेरी कंड्क्टर आणि मुंबईचे लोक....

पुणेरी कंड्क्टर आणि मुंबईचे लोक, सारखेच.


पुणेरी कंड्क्टर म्हणजे इरसाल असामी. तुम्ही पुण्यात नवीन आहात असे त्याला माहिती झाले, तर तुमची गय नाही.


नवीन माणसाला स्टेशन ते स्वारगेटला जायचे असले तर हा त्याला कॉरपोरशनच्या बसमध्ये हमखास बसवणारच.


तुमचा स्टॉप आला तरी सांगणार नाही. काही बोललो तर तुमच्यावरच खेकसणार.


सुट्टे नसणे, हा पुणेरी कंड्क्टरांच्या मते प्रवाशाने केलेला भयंकर अपराध. त्यासाठी तो तुम्हाला बसमधुन उतरवल्याशिवाय सोडणार नाही, आणि ज़री सोडलेच तर तुमचा स्टॉप येईपर्यंत तुम्ही लाजिरवाण्या स्थितीत पोहोचलेले असता.


तिकिट देणे म्हणजे त्याच्या मते प्रवाश्यावर त्याने केलेले अगणित उपकार.


फ़रक एकच, पुण्यात कंड्क्टर तुमची खेचणार आणि मुंबईत लोक.


मुंबईत तुम्ही काहीही चुक केली तरी शेंबडे पोरही तुम्हाला म्हणतील, "मुंबईमे नया आया क्या..?"


लोकलमध्ये धक्का लागला तर हमखास डायलॉग येणार, "मुंबईमे नया आया क्या..?"


बेस्ट बसची खिडकी बंद करता येत नाही..? मग मागून आवाज़ येणार "मुंबईमे नया आया क्या..?"


फ़ुटपाथवर किंवा रेल्वे रेझर्वेशन लाईनमध्ये कुणाला धक्का लागला..?


"मुंबईमे नया आया क्या..?"


अहो, भाजीवाल्याशी घासाघीस केली तर तो म्हणणार, "एकही भाव, पता नही ..? मुंबईमे नया आया क्या..?"


एकुण काय, मुंबईत रहायचे म्हणजे सार्वजनिक ठिकाणी तुमच्याकडून काहीही चुकी होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार.


आणि पुण्यात रहायचे तुम्ही कंड्क्टर या महाभागाच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी लागणार.


(ता.क.: अशुद्धलेखन झाले असल्यास चु. भु. देणे घेणे आणि वरील लेख हा विरंगुळा समजूनच वाचावा, कुणाच्या भावना दुखविण्याचा हेतु नाही.)