आपला तो बाब्या अन दुसऱ्याचा तो कार्टा?




            "मराठी भाषेत संस्कृत शब्द घुसवले की मराठी भाषा समृद्ध होते असे वाटण्याचे कारण काय असावे याचे उत्तर कधीही मिळलेले नाही.
जर संस्कृत शब्द मराठीत आणणे हे चालते तर इंग्लिश, फ्रेंच (का याला फरांसिसी म्हणू?), पोर्तुगीज, स्पॅनिशने काय घोडे मारले आहे? जाणकार सांगू शकतील की  या व जगातील इतर अनेक भाषा मराठी/इंग्लिश/संस्कृत इतक्याच (कदाचित जास्त) समृद्ध आहेत.

          कि आपला तो बाब्या अन दुसऱ्याचा तो कार्टा?  "




           इंग्लिशाळलेले मऱाठी : काही उपाय? ह्या चर्चेतला अभय नातूंचा हा प्रतिसाद. मला पटला. इंग्रजी भाषेचे चेच उदाहरण घ्या. नवे शब्द आणण्यासाठी केवळ लॅटिन भाषेवर ती अवलंबून नाही. इतर भाषांतले असंख्य शब्द तिने आपलेसे करून घेतले. इतके की ते आता अगदी इंग्रजी वाटतात. उदा. जगरनॉट. त्यामुळे इंग्रजी शब्दांचे भांडार समृद्ध झाले.

           तसेच संस्कृतातून आणलेले, तिला वापरून बनवलेले शब्द/प्रतिशब्द बरेचदा फार क्लिष्ट, बोजड असतात. डोक्यावरून जातात. कारण ते समजण्यासाठी संस्कृतचे किमान जुजबी ज्ञान आवश्यक असते. आणि प्रत्येकाला हे ज्ञान असेलच असे नाही.

        ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यावर वाटते, संस्कृतचा अट्टाहास का? नातूंच्या म्हणतात तसे "आपला तो बाब्या अन दुसऱ्याचा तो कार्टा?" का?