(कबीर)

तुलाच होकार द्यावया का मला न थोडा उशीर झाला?
तुझ्यासवे राहुनी सखे हा हुशार सुद्धा बधीर झाला
 
कधीच नाही सुटावयाचा असा तुझा मोहपाश आहे
मलाच ती गाठ सोडण्याचा कधी पुरेसा न धीर झाला

पदोपदी भास होत आहे , जणू तिचा स्पर्श हाच आहे
सदेह भेटायला तिला फक्त हा दिवाणा अधीर झाला

असे कसे वाटले प्रसिद्धी सुखासुखीही मिळून जाते?
उगीच काही विडंबने पाडुनी कसा हा बेफिकीर झाला?

मला न पर्याय शोधला ! लेखणी दिली माझिया हवाली
मला न पर्याय शोधल्याने प्रकाशकाचा फकीर झाला
- कारकून

माझी प्रेरणा वैभव जोशी ह्यांची गझल- कबीर