कशी पाठ मी खाजवावी स्वतःची

आमच्या "पाठी"शी चित्त यांची अप्रतिम प्रेरणा अशी वाट चोखंदळावी स्वतःची


कशी पाठ मी खाजवावी स्वतःची
जिथे पोचती ना हि बोटे स्वतःची


करी कंड बेचैन इतका मला की
मला वाटते पाठ फाडावी स्वतःची


तुझे हात आणि आता पाठ माझी
अशी खाज मी भागवावी स्वतःची

जरा लाव पावडर पाठी माझ्या
कशी गंधवार्ता टळावी स्वतःची

नव्या पाहुनी ह्या गझलेसी सुंदर
विसरलो पुन्हा मी प्रतिज्ञा स्वतःची

पुरे जाहली विडंबने अनिरुद्धा
लिहावी आता तू कविता स्वतःची

-(खाजाळलेला) अनिरुद्ध अभ्यंकर