बदाम

बदाम

विक्स, वाफ वा बाम नाही
नाक वाहते, जाम नाही 

      कोणते   इथे काम नाही ....
तरि घरात आराम नाही

कृष्ण हो जरा तू लवकरी
घेत का कुणि सुदाम नाही?

प्रेम कर ,तुज लगाम नाही
(स्वस्त पण बघ  बदाम नाही)

पाय घसरुनी मोडलेला
वजन वाढ, व्यायाम नाही

एकनिष्ठ  मी नोकरीशी
नोकरीत मज काम नाही

कारकून बघ हा बिचारा
घेत एकहि छदाम नाही 

मूळ रचना-  मिलिंद फणसे-  (प्रेम)