विज्ञान मराठीतूनच शिकवा.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1696791.cms">

डॉ. नारळीकरांचे आग्रही मत

म. टा. प्रतिनिधी

मुलांचा विज्ञानाचा पाया पक्का होण्यासाठी प्राथमिक शाळांमध्ये विज्ञान मातृभाषेतूनच शिकविणे गरजेचे आहे. तरच ते अधिक प्रभावी ठरू शकेल, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले.

मराठी अभ्यास परिषदेतफेर् 'विज्ञानाची मराठी किती पुढे? किती मागे?' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन क रण्यात आले होते. त्यामध्ये डॉ. नारळीकर यांच्यासोबत डॉ. बाळ फोंडके, डॉ. पंडित विद्यासागर, अशोक पाध्ये सहभागी झाले होते. काळानुरूप प्रत्येक भाषेतच परिवर्तन होत असते. नव्या उपयुक्त शब्दांचा भाषेत समावेश करणे हे भाषेवरील आक्रमण मानता कामा नये. उलट त्यामुळे भाषा अधिक समृद्ध होते. मराठी भाषेचा अधिकाधिक वापर वाढविण्यासाठी भाषा आणि आधुनिकता यांची सांगड घातली पाहिजे, असे मत यावेळी डॉ. नारळीकर यांनी व्यक्त केले. विज्ञानाचा मराठीतून वापर वाढण्यासाठी विज्ञान आणि भाषातज्ज्ञांंनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत डॉ. बाळ फोंडके यांनी व्यक्त केले. नवीन शब्द रुढ करताना त्याचे प्रमाणीकरण व्हायला हवे. तसेच अधिक उत्तम प्रतिशब्द स्वीकारण्याची ठराविक पद्धत निश्चित करायला हवी, असे त्यांनी सांगितले. विज्ञानाच्या परिभाषा आणि संकल्पनांना मराठीत शब्द रूढ होण्याची गरज आहे. सरकारची धोरणेही नवीन शब्द प्रचलित होण्याच्या आड येतात. पाठ्यपुस्तक निमिर्तीच्यावेळीही नवीन शब्द वापरण्यात बरेच अडथळे येत असल्याचे अशोक पाध्ये यांनी सांगितले. मराठीचा वापर वाढविण्यासाठी तिची उपयुक्तता पटवून देणे आवश्यक आहे. इंग्रजी भाषेने काही मराठी शब्द स्वीकारले असताना आपण इंग्रजी स्वीकारण्यात काय गैर आहे. मराठीतून विज्ञान शिकविण्यासाठी आणि वाचण्यासाठी प्रथम भाषेची आवड निर्माण होणे गरजेचे आहे, असे मत विद्यासागर यांनी व्यक्त केले.