नकोच चनिया नकोच चोळी
नवार ल्यावी मराठमोळी
मिटून घे तू हळूच खिडकी
बघेल जनता उगाच भोळी
तुझ्या मनीचे रहस्य दिसते
अनेक बोके तुझ्याच बोळी
नकाच तापू पुन्हा तव्यांनो
क्षणात येथे फुगेल पोळी
कवीच आम्ही! जगास छळण्या
भरू फुकाच्या अखंड ओळी
- माफीचा साक्षीदार, मनोगत
कुमार जावडेकर ह्यांच्या मराठमोळी वर आधारित अक्षरगणवृत्तातील प्रतिसाद.
समांतर मात्रावृत्तातील प्रतिसाद - केशवसुमार ह्यांचे मराठमोळी-२
नकोच चनिया नकोच चोळीनवार ल्यावी मराठमोळी