आमची प्रेरणा संपदा१ यांची कविता दाद
कोणत्या नावने मी रे
आता लिहावे ना कळे
ह्या विडंब वणव्यात
काव्य कोवळे हे जळे
शब्द दाहक, बोचरे
त्यांना घाबरले मन
प्रश्न सतावतो पुन्हा
कसे करावे लेखन
कसे आवरावे त्याला
द्या हो कुणी त्याला मार
आग ओकतो येव्हढी
लाज काढतो हा पार
अधी तिने केला बघा
"केसु" नावाचा घोटाळा
थंड रक्ताने करेन
मी काव्याचा चोळामोळा
केसुभाईं