अजुन २६ रस्त्यांवर बि.आर.टी.....बोंबला....

दिल्लीतील आय आय टी ने पालिकेत दिलेल्या प्रस्तावानुसार, अजुन २६ रस्त्यांवर बि.आर.टि योजनेचा विचार करण्यास सांगितला आहे.....

त्यासाठी निधी उपलब्ध आहे तो ५७६ कोटी रुपयांचा....!!        म्हणजे हयातले ४०% आधिच चोरापोरांवर जाणार, नियमित वेळेत काम होणार नाहि आणि नंतर पुन्हा निधी ची मागणी होणार....!!

इतके हरामखोर आणि भ्रष्ट राजकारणी आणि त्यांचे चेले...मिळुन पुण्याच्या इंफ़्रास्ट्रक्चर ची (ठोकायला) वाट लावायला बसलेत..... आज आपण सगळेच बघतोय,सातारा रोड वर काय गोंधळ चालू आहे....बसेस व्यतिरिक्त सगळी वाहने त्या मर्गावरुन जातात..आणि नविन विकत घेतलेल्या बसेसपैकी फ़क्त ३-४ बसेस दिसतात...बाकिच्या गेल्या कुठे ???

एक रस्ता धड ठेवायचा नाही असाच जणु पालिकेने चंग बांधलेला आहे....आणि साले स्वतःला पटेल तसे वागत आहेत,तालिबानि राजवटिची सावली पडत चालली आहे.....(माफ़ करा पण "अराजकता" वर्णनास ह्यापेक्षा वेगळे उदाहरण सापडले नाही)

ह्यांच्याकडचा जो निधि आहे त्याने निदान गर्दीच्या चौकात २४/७ चालणारे वाहतुन नियंत्रण दिवे बसवा( सगळे लोक पाळतील,अस नाही म्हणत मी पण, काहिच नसण्यापेक्षा काहितरि.... तुका म्हणे त्यातल्या त्यात !)

६ सिटर प्रमाणे एखादा ट्रान्सपोर्ट चालु करा...कबुल की रस्तेच कमी पडत आहेत..पण बि.आर.टि मुळे हा प्रश्न सुटणार नाहिये..त्यापेक्षा जेथे जेथे शक्य आहे,तेथे लवकरात लवकर ओव्हरब्रिज तयार करा..(आपल्या युनिवर्सिटी च्या इथल्या प्रमाणे नको...वर्षोनुवर्षे बांधकाम चालुच आहे......मध्ये अभियांत्रिकिच्या civil ब्रांच च्या विद्यर्थ्यांकडुन इन्फ़्रा-स्र्टक्टचर चे नकाशे मागवुन घेणे चालु होते...

पुण्यासोबत कसले प्रयोग करताय यार.....आधिच दुष्काळ त्यात तेरावा महिना...