नमस्कार,
मला नेहमी महाभारताविषयी विविध प्रश्न पडतात. त्यापैकी एक म्हणजे -
धर्मयुद्धातील तीन महारथींचे वध - कर्ण, भीष्म, द्रोण !
या तिघांचाही कृष्णाने आणि पांडवांनी कूटनीतीने, नि:शस्त्र असताना वध केला.
श्रीकृष्ण जरी धर्माच्या बाजूला होते तरी त्यांनी खूपच अधर्माने या तिघांचा वध केला (करविला) असे मी मानतो. जरी हे तिघे अधर्माच्या बाजूने लढत होते, तरी ते आपले जीवित कार्य/कर्तव्य पार पाडीत होते जसे मित्र(कर्ण), कुरुंच्या गादीचे रक्षण(भीष्म - त्यासाठी ते आजन्म ब्रह्मचारी राहिले होते), सेनापती (द्रोण). हे वध मला श्रीकृष्णांच्या चरित्रावरील डाग वाटतात.