तिची माझी मैत्री खूप जुनी. अगदी लहानपणापासूनची. एकत्रच खेळ, अभ्यास, शाळा. लहानपणाची लटकी भांडणं, लपंडाव, उन्हाळ्याच्या सुट्टीत कैर्या, चिंचा खाणं सगळं तिच्या साथीनं झालेलं. मग का कुणास ठाऊक, कॉलेज सुरू झाल्यावर संपर्क कमी झाला. भेट व्हायची, पण आधीसारखी जवळीक राहिली नाही. पीएचडी संपल्यानंतर कामासाठी इथे इटलीत आलो आणि संपर्क जवळजवळ तुटलाच.