डायरी ३

मी भैरवी. मी ह्या कॉलेज मध्ये नविनच ऍडमीशन घेतली आहे. डायरीच्या निमित्ताने तुमच्याशी ओळख करून घेते आहे.

गुरूवार १२ फेब्रुवारी

आज दोन दिवसांनी कॉलेजला आले. सगळे लेक्चर्स अटेंड केले. प्रचंड बोअर झाले. आधिच्या नोटस पुर्ण कराव्या लागणार. आधिच नविन ऍडमिशन. त्यात दांड्या. ईंप्रेशन खराब नको व्हायला. उद्याच्या DS च्या प्रॅक्टीकलला आज शिकवलेलं करायचं आहे म्हणून लायब्ररीत पुस्तक घ्यायला गेले. एकच कॉपी होती. ती सुद्धा रीझर्व्हड. तेव्हढ्यात ते घ्यायला प्राजक्ता नावची एक मुलगी आली. ती पण माझ्याच वर्गातली होती. "New admission ना?" म्हणत तिनेच सुरुवात केली. तुला पुस्तक हवं असेल तर घे, मी नंतर घेते म्हणाली. मला नोटस हव्या आहेत कळल्यावर तिने तिच्या बुक्स मला दिल्या. चला नवीन कॉलेज मध्ये एक छान मैत्रिण मिळाली. आम्ही नंतर एकत्र चहा घेतला आणि बऱ्याच वेळ गप्पा मारल्या.

कँटीन मधून बाहेर पडतांना निलेश दिसला. बळेच हसला. मला पण हसावं लागला. ह्याला मी HOD ची केबीन विचारून चूक केली बहुतेक. कारण त्याचा मित्र मला दिवसभार न्याहाळत होता. आत्ता सुद्धा टक लावून बघत होता. बावळट कुठला. मी प्राजक्ताला विचारलं की कोण आहे तो. त्याचं नाव मनोज म्हणाली. का कोणास ठाउक, तिचा मुड थोडा पालटला होता. नंतर जास्त बोलली नाही.

=========================================================

शुक्रवार १३ फेब्रुवारी

आज नोटस कंप्लीट केल्या. प्राजक्ताची प्रॅक्टीकला खुप मदत झाली. छान मुलगी आहे. खुप साधी पण स्मार्ट आणि हुषार आहे. तिने नोटस पण छान काढल्या होत्या. सुंदर अक्षर. मॅडमच्या वहीत एक छान कविता पण मिळाली, अर्धी लिहीलेली. तिला विचारलं की ती कविता पुर्ण कधी करणार, तर म्हणे, ती कविता कधिच पुर्ण नाही होणार. तिचा नेहमीचा आनंदी मुड बदलून गेला. मला काही समजलं नाही. बहुतेक प्रेमात पडलेली दिसते आहे.

आज मनोजशी बोलतांना दिसली. मला माहीत नव्हतं की तो तिचा मित्र आहे.

=========================================================

(क्रमशः)