"मनू-स्मृती"मध्ये संपूर्ण समाजाच्या सर्व बाबींचा विचार करून तत्कालीन गरजा,वास्तविकता या विचारात घेऊन माणसांनी कसे वागावे ,याबद्दलचे नियम दिले आहेत.त्या नियमांचे पालन केले तर पुण्य-प्राप्ती होउन स्वर्गात जागा मिळेल व त्याविरुद्ध आचरण केल्यास कोणती शिक्षा/प्रायचित्य घ्यावे ,याबद्दल ही स्पष्ठ नियम दिले आहेत.कालौघात त्या नियमांचे पालन करणे व त्यानियमांच्या विरूद्ध आचरणा साठी प्रायचित्ये घेणे ,हेच हिंदू धर्माचे लक्षण ठरले गेले.तसे वागणे म्हण्जेच पुण्य/पाप मानले जाऊन ,ती परंपरा पक्की झाली.यामध्ये ज्याना शारीरिक ,मानसिक ,वित्तीय हानी सहन करावी लागत होती,ती माणसे ही आपल्या नशीबात हेच भोगणे आहे,असे मानून ते आचरण करीत होती.त्याबद्दल त्यांची तक्रार नसे.त्याचप्रमाणे आपले वागणे दुसर्याना त्रासदायक ,मानहानीचे,वित्तऱ्हानीचे होत आहे,ह्याची जाणीव होऊनसुद्धा,तसे वागणे हाच धर्म अशी मानसिकता झाल्यामुळे दैनंदिन आचरणात कोणीच बदल करत नव्हते.
पण ब्रिटीशांच्या अमदानीता शिक्षणाने शहाणी झालेल्या माणसामध्ये त्रासदायक परंपराबद्दल तक्रार करण्याचे धाडस निर्माण झाले.त्यातूनच अस्पृश्यता-विरोध,स्त्री-स्वातंत्र्य,स्त्री-शिक्षण,बाल -विवाह,बालविधवा-विवाह इ.आधुनिक विचारांचे समाज सुधारक निर्माण झाले.राजा राममनोहर राय,आगरकर,म. ज्योतीबा फुले,छत्रपती शाहू महाराज,भारत रत्न बाबास्साहेब आम्बेड्कर ही त्यातील अग्रणी मंडली होत.या सर्वानी ''मनू-स्मृती''तील चालू काळात विसंगत _माणसाने माणसामध्ये भेद मानून वर्तन करण्याच्या नियमाना 'त्याज्य' ठरविले्ए योग्यच झाले आहे.पण उठ-सुठ आजच्या काळात कुठे ही,कोणाकडून ही कटू घटना घडल्यावर"मनूस्मृतीकाराला"अपराधी ठरविणे योग्य वाटत नाही. शासनाने वेळोवेळी अनेक कायदे केले आहेत.त्यानुसार शिक्षाही दिल्या जात आहेत. स्वर्थ,क्रोध,मी-पणाचा वृथा अभिमान यापैकी एक अथवा सर्वचकारणापोटी एका व्यक्तीने वा समुहाने काही वर्तन केल्याबद्दल,त्याचा दोष हजारो वर्षापूर्वी समाजाला प्रबोधन करणाऱ्या मनूला देणे सर्वार्थाने चुकीचे आहे.तरी मनू-स्मृतीतील चांगल्या विचारांचे पालन करावे व कालबाह्य प्रथांचा त्याग करुन ,माणसानी परस्पर सामंजस्याने रहाणे योग्य होइल. सबब यापुढे मनूला दोष देणे बंद करावे.