खोबऱ्याचा बिनाअंड्याचा केक

  • १७५ ग्राम साखर,२५० ग्राम मैदा,१२५ ग्राम खोवलेले खोबरे
  • ४ चमचे तूप/लोणी,पाव कप दूध,१.५ चमचे वॅनिला अर्क,२.५ चमचे बोकिंग पावडर
१ तास
४,५ जणांना

लोणी भरपूर फेटा,साखर घालून फेटा, खोबरे घालून फेटा,दूध+वॅनिला अर्क घालून फेटा.
मैदा+बेकिंग पावडर एकत्र करून चाळून घ्या.व वरील मिश्रणात घालून फेटा.केक च्या साच्याला लोणी लावून घ्या.व त्यात हे मिश्रण घाला. १८० ते २०० अंश से. वर ३० ते ३५ मिनिटे बेक करा.

प्राजु, बिन अंड्याच्या केकच्या अजून एक दोन पाकृ आहेत त्या मिळवण्याचा प्रयत्न करते आहे.

सौ.आई