ही कोण स्वप्नात दिसली
ही कोण हृदयात ठसली
नभ झाले मज ठेंगणे हे
मम जीवनी प्रीत वसली ।ध्रु।१
गं प्रिये ... ... ...
दर वळणावरी जीवनाच्या
गात गाणे पहा मी निघालो
भान माझे कुठे काय सांगू
पायऱ्यांशी२ न रमता निघालो ।१।
ही कोण स्वप्नात दिसली ...
आज सजल्यात साऱ्या दिशा या
वाटते खोलले स्वर्गदारा
रूप झालेय माझे पहाता
मजवरी रोखल्या सर्व नजरा ।२।
ही कोण स्वप्नात दिसली ...
मृत्यु येतो जरीही तनूला
मृत्यु आत्म्यास या येत नाही
दीप्त राही सदाकाळ प्रीती
नष्ट दीप्ती तिची होत नाही ।३।
ही कोण स्वप्नात दिसली ...
टीपा:
१ पाठभेद :
ही कोण स्वप्नात आली
हृदयात ऱ्हाते म्हणाली
नभ झाले मज ठेंगणे हे
मम जीवनी प्रीत आली
आणखी पाठभेद : ही कोण स्वप्नात दिसली - ही कोण हृदयात घुसली
२ पाठभेद :
स्थानकांशी, आसऱ्यांशी
चाल : मूळ गाण्याचीच! (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल
)
विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा.
२. उत्तरे व्यनि तून पाठवू नयेत.
३. प्रशासक, प्लीज, बरेच जमेपर्यंत प्रतिसाद थोपवून धरा. (नाहीतर एकमेकांची बघून उत्तरे लिहतील
)
४. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका
काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा.) ... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे
)