स्मरण्याजोगे शैशवात त्या अगदी काही काहिच नव्हते
सखे सवंगडी सगळे असता कुणीच त्यातिल माझे नव्हते
बालसुलभ ना खोड्या केल्या कधीच निर्भर हसले नव्हते---
इतके सगळे असतानाही कशास स्मरते उगाच सारे
आठवती मज तुझ्यासंगती घालवलेले क्षण ते न्यारे
एकलकोंड्या किल्ल्याचे त्या दार मोकळे तुलाच होते
नकळत अपुल्या दोघांच्याही जुळले हळवे--निर्मळ नाते
तू नसल्यावर स्मृतिपटलावर कधीच उरले नसते शैशव
विस्मरले नसते मी पत्थर
------कधीच फुलली नसती हिरवळ---