नमस्कार वाचकहो,
सॉफ्टवेअरच्या क्षेत्रातली एक कल्पना लेखन क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर करण्याचा हा एक प्रयत्न.
मुद्दा असा आहे की सध्या कोलॅबोरटीव्ह ( मराठी शब्द? ) पद्धतीने बराच जोर धरलाय. तेंव्हा एखाद्या लेखकाने कथेचा भाग मांडावा आणि इतर वाचकांनी त्यावर दुसरा भाग जोडून (उदाहरणार्थ एक विनोदी कथा) पुर्ण करावी. आता साहजिकच आहे की वाचकांचे बरेच प्रतीसाद आले तर त्यातला नेमका चपखल भाग कुठला तेही वाचकांनीच ठरवायचे.
काय आहे अहो - गणिती कोडी सोडवायचे म्हणजे मेंदुला जोर द्यायचा म्हणजे.... जाउ द्यात.
काय म्हणता मंडळी - तेंव्हा एखाद्या उमद्या लेखकाला/ लेखिकेला भाग १ लिहून श्रीगणेशा करण्याची [त्यावर प्रतीसाद येतील अशी माफक अपेक्षा (गृहीत धरून) ]नम्र विनंती
या प्रयोगावरही आपली काही (अगदी स्पष्ट सुद्धा) माडावीत :-)
आता प्रयोग हे काही यशस्वी होतात काही फसतात, बघुया काय होते ते !!!
विनम्र