मी संशयी..उगाच?

माझं मन
फुललं की
माझ्या अंगणातला तो पारिजात लदबदतो.... शब्दांनी.
मग मी तसाच
- हार बीर गुंफण्याच्या भानगडीत न पडता-
ओंजळीत मावतील तितके..
सुटे सुटे शब्द घेऊन
धावत जातो तिच्याकडे
आणि म्हणतो 'माळ तुला हवे तसे'
तर ती हसून माझी ओंजळ
रिकामी करते...आपल्या देहावर (तिला हवी तशी... )
मग त्या शब्दांची होतात... सुरेल गाणी
तिच्या...अंगा-अंगावर.. इथे तिथे
आणि
माझ्या आधीच दाद येते
त्या लदबदलेल्या पारिजाताची.
तो हजर झालेला
आपली सगळी श्रीमंती घेऊन..
आणि मी संशयी..उगाच?

(जयन्ता५२)